गीता गुरुकुल प्रकाशित साहित्य

 १. सुबोध गीता सार :-
श्रीमद्भगवतगीतेत जे जगण्याचे शास्त्र सांगितले आहे ते १८ योगांद्वारे सांगितले आहे. जीवनात आचरण करण्याच्या भूमिकेतून किंवा दृष्टीकोनातून आपण गीता वाचली आहे का? तरुणांनी गीतेचा अभ्यास वा योगाचा अर्थ समजून घेतला आहे का? या उद्देशाने गीता फौंडेशन, मिरज ने "सुबोध गीता सार" हि ३२ पानांची पुस्तिका ८ वर्षांपूर्वी प्रकाशित केली. प्रत्येक अध्यायाचे सार या पुस्तिकेत आहे. गीता अध्ययनाची आवड निर्माण करणे, गीतेतील तत्वज्ञानानुसार आचरण करणे शक्य आहे/आवश्यक आहे हा भाव दृढ करणे हा या पुस्तिकेचा उद्देश. ३२ पानांच्या या पुस्तिकेची किंमत आहे मात्र ५ रुपये. आजपर्यंत या पुस्तिकेच्या सुमारे ७५००० प्रती वितरीत झाल्या आहेत. हेच गीतेचे आणि गीतेतील योगाचे महात्म्य म्हणता येईल.          
 २०१५ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण या पुस्तिकेच्या किमान १५ प्रती वितरीत करा ही प्रार्थना. पुस्तिकेची किंमत रु. ७५/- (१५ X ५) आणि कुरियर चे रु. २५/- असे रु. १००/- चेकद्वारे (गीता फौंडेशन या नावाने) पाठवा व पत्ता कळवा. पुस्तिका पाठवल्या जातील. ९८६००३२०८२ या भ्रमणध्वनी वर sms करून अथवा geetafoundation@gmail.com या ईमेल आयडी वर मेल पाठवा. नवीन वर्षाची भेट आणि गीतेद्वारे योगाचा प्रसार असा दुग्धशर्करा योग साधा.

सुबोध गीता सार
     
२. गीता यज्ञ:-
गीतेचा सखोल अभ्यास करायचा असेल तर त्या साठी " गीता यज्ञ--अर्थात जीवनाचे आचरणशास्त्र " हे ५५० पानांचे पुस्तक पण उपलब्ध आहे (किंमत रु. ३००/- + कुरियर खर्च रु. २५/-; एकूण रु. ३२५/-). 
केवळ पुस्तिका व पुस्तक देऊन न थांबता, शंकांचं यथामति- यथाशक्ती समाधान करण्याचा प्रयत्न पण केला जाईल.
३. श्री विष्णुसहस्रनाम :-
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील सर्व १००० नामांच्या अर्थाचे पुस्तक तयार झाले आहे. ४२८ पानांच्या या पुस्तकाची किंमत रु. २५० आहे. (ट. ख. रु. २०) आपण हे पुस्तक अवश्य वाचावे।

पुढील काळात भाग्वातावरील विस्तृत विवेचनात्मक पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे. पुस्तक प्रकाशन हा हेतू नसून भागवत धर्माचा प्रसार हे उद्दिष्ट आहे

No comments:

Post a Comment