Tuesday 25 June 2019

गीता फौंडेशन
चैतन्य, लोकमान्य सोसायटी, मिरज
ई-मेल : geetafoundation@gmail.com
Website : www.shrivishnusahasranaam.com
Mobile : 9860032082 / 9021938204

३ जून, २०१९

गीता फौंडेशन, मिरज तर्फे श्रीविष्णूसहस्रनामाच्या १२ कोटी सामूहिक आवर्तनांचा संकल्प केला आहे. हा उपक्रम १ जानेवारी २०१९ पासून सुरु झालेला आहे. याबद्दलची माहिती खालील प्रमाणे.

उद्देश : दुसऱ्याचे निःश्रेयस करण्याची, चांगले करण्याची, त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची वृत्ती दृढ व्हावी हि प्रार्थना

दररोज आपापल्या घरी, दिवसातून केव्हाही विष्णुसहस्रनामाची आवर्तने करायची. महिन्यात एकूण किमान १०८ आवर्तने अथवा दिवसाला किमान दोन आवर्तने करायची. यापेक्षा जास्त झाल्यास उत्तम. महिन्याभराची (म्हणजे दैनंदिन) आवर्तनांची नोंद ठेवायची व महिन्याच्या एकूण आवर्तनांची संख्या पुढील महिन्याच्या १५ दिवसांपर्यंत केव्हाही संस्थेला कळवायची.

उपक्रमात भाग घेण्यासाठी संस्थेला खालील माहिती कळवा.

आपले संपूर्ण नाव,  आपले वय, आपल्या गावाचे नावं आणि आपला मोबाईल नंबर. एक मोबाईल नंबर एकदाच एका नाव नोंदणीसाठीच वापरायचा. नाव नोंदवल्यानंतर प्रत्येकाला एक नोंदणी क्रमांक दिला जातो. तो नोंदणी क्रमांक, आपले नाव,  महिना आणि आवर्तनांची संख्या संस्थेला कळवायची. या महिन्याची आवर्तनांची संख्या पुढील महिन्यात, पुढील महिन्याची आवर्तनांची संख्या त्यापुढील महिन्यात याप्रमाणे कळवत राहायचे.

श्रीविष्णूसहस्रनामाचे स्तोत्र म्हणावे हि अपेक्षा. पण कोणी नामावली म्हटली तरी चालेल.

नाव नोंदणी व आवर्तन नोंदणीसाठी खालील नंबरवर फोन करा.
  • 9860032082 - नितीन (Whatsapp नंबर)
  • 9021938204 - राधा
नाव नोंदणी / आवर्तन नोंदणीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळावर जाऊन स्वतः देखील नोंद करू शकता.

       सध्या सुमारे १२,००० जणांनी नावे नोंदवली आहेत. पण एवढ्या बळावर संकल्प पूर्ण होण्यास खूप वर्षे लागतील. संकल्पपूर्ती लवकर होण्यासाठी सभासद संख्या ४०,००० पेक्षा जास्त झाली पाहिजे. त्यासाठी आपण उपक्रमाचा खूप प्रसार करा. आपण whatsapp ग्रुप करून त्यावर लोकांना invite करा. संस्थेला फोन करून नाव नोंदणी करा असे आवाहन करा. उपक्रम जगभर पोहोचला पाहिजे. एकट्या महाराष्ट्रातून ४०,००० सभासद होणे अवघड नाही. सर्वांच्या सहकार्यानेच हा नामयज्ञ सफल होऊ शकतो.

काहीही अधिक माहितीसाठी वरील नंबरवर मला संपर्क करा. माझे नाव आपटेकाका.

धन्यवाद
श्रीकृष्णः शरणं मम |

आपला सुहृद,
आपटेकाका

Monday 22 October 2018


जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२९ या १० वर्षात श्री विष्णुसहस्रनाम पठणाचा  १२ कोटींचा संकल्प.


।।गीता फाऊंडेशन ।।
चैतन्य, लोकमान्य सोसायटी, पंढरपूर रोड,
मिरज (४१६४१०) जि. सांगली
मो. ९८६००३२०८२, ईमेल- geetafoundation@gmail.com

सप्रेम नमस्कार,
आपणा सर्वांच्या सहकार्याच्या प्रार्थनेने गीता फाऊंडेशनने खालील संकल्प केला आहे.

जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२९ या १० वर्षात श्री विष्णुसहस्रनाम पठणाचा  १२ कोटींचा संकल्प.

नमो भगवते वासुदेवाय यातील प्रत्येक अक्षरासाठी कोटीचा जप करायचा. त्यासाठी किमान १६६६६ जणांनी मिळून प्रत्येकाने आपापल्या घरात दिवसभरात केव्हाही किमान आवर्तने करावी ही अपेक्षा, तरच १० वर्षात संकल्पसिध्दी होईल.

उपक्रम जानेवारी २०१९ पासून सुरू होत असला तरी नावनोदंणी सुरू झाली आहे.
या संदर्भातील सर्व माहिती, नाव आवर्तन नोंदणी . सर्व संगणकावर सोप्या पध्दतीने करून ती संग्रहित करण्याची सोय असेल. त्या वेबसाईटवर( संकेतस्थळावर) श्री विष्णुसहस्रनाम ऐकायला १००० नामांचे अर्थ वाचायला उपलब्ध असतील.
संकेतस्थळ जानेवारी २०१९ पासून कार्यान्वित होईल. आपण त्याआधीच नाव नोदंणी करावी ही प्रार्थना.
त्यासाठी संस्थेला खालील माहिती हवी.

पठण करणा-याचे पूर्ण नाव, गावाचे नाव आणि मोबाईल नंबर (स्वच्छ स्पष्ट असावा) एवढी माहिती आवश्यक आहे.
जानेवारी २०१९ नंतर नोदंणी संगणकावर प्रत्येकाला आपापली करता येईल. पण सध्या संस्थेकडे तुम्ही ही माहिती द्यावी. आपणा प्रत्येकाला SMS द्वारा नोदंणी क्रमांक कळवला जाईल. प्रत्यक्ष आवर्तने करणे त्याची दरमहा संगणकावर नोंद करणे ही जानेवारी नंतरच करायची आहे. अनैतिकतेच्या अतिरेकास नैतिकतेच्या अतिरेकानेच प्रत्युत्तर देता येते. त्यासाठी जास्तित जास्त लोकांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त आवर्तने करणे जरूरी आहे.

मला आपणा प्रत्येकाकडून किमान १० जणांची नोंद अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या म्हणजे आपल्या कुटुंबातील, नातेवाईकातील, परिवारातील, मित्रमैत्रिणीतील, देश आणि परदेशातील प्रत्येकाच्या संमतीने त्यांची नावे कळवा. नाव देताना प्रत्येकाला कल्पना द्या की हा उपक्रम १० वर्षे चालणार आहे.

नाव नोदंणीचे पर्यायपोस्टकार्ड / पत्र, SMS किंवा -मेल. (व्हाँटसप नको)

नाव नोदंवताना श्रीविष्णुसहस्रनाम पठणासाठी असा स्पष्ट करावा वरील गोष्टी कळवाव्या. मोबाईल नंबर शिवाय संगणक नाव नोदंवून घेणार नाही.
उपक्रमाच्या सफलतेसाठी जरी किमान १६६६६ जणांची नोदंणी होणे आवश्यक असले तरी किमान २५०००० जणांची नोंद व्हावी हा प्रयत्न. हे आपल्या सहकार्यानेच शक्य आहे.

धन्यवाद. श्रीकृष्ण: शरणं मम।

आपला सुह्रद
आपटे काका

Monday 17 September 2018



नमस्कार!

९ डिसेंबर २०१८ पंढरपूर येथील भागवत एकादश स्कंध पठणाचे आमंत्रण 

९ डिसेंबर २०१८  रोजी पंढरपुर येथील श्री। ह.भ. प. गोविंद महाराज केंद्रे यांची धर्मशाला,  सांगोला चौक , सांगोला रोड, पंढरपुर येथे  श्रीमद भागवत महापुराणातील एकादश स्कंध  पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या दिवसभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा खलील लिंक मधे दिली आहे.



९ डिसेंबर २०१८ पंढरपूर येथील भागवत एकादश स्कंध पठणाचे आमंत्रण

Thursday 22 February 2018

Subodh Geeta Sar English

Dear All,
Please find below link of Subodh Geeta Sar English. Request you to please read and forward it to more people...

Thanks & Regards,
 Apate Kaka

Subodh Geeta Sar English

Tuesday 25 October 2016