उपक्रम


१. संस्थेचा सर्वात जिव्हाळ्याचा उपक्रम म्हणजे "गीता गुरुकुल मासिक"अशा मासिकाद्वारे ५ वी ते १० वी मधील मुलांवर संस्कार करणे हि काळाची निकड असून असे शिक्षण देणे अत्यावश्यक बनले आहे. आधुनिकता हवी परंतु ती नीतिमत्तेच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणारी नको. गीता गुरुकुल" या मासिकाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
       -->  या मासिकाद्वारे शालेय मुलांना त्यांच्या आकलनशक्ती नुसार गीता; भागवत,    उपनिषदे; वेद् या मधील तत्वज्ञान सोपे करून समजावले जाईल.  
       -->  अध्यात्मिक वृत्तीबरोबरच मुलांच्या सर्वांगीण प्रगती साठी गणिती वृत्ती असणे फार महत्वचे. म्हणून मासिका द्वारे त्यांना वैदिक गणित शिकवले जाईल.
       --> "हे विश्वची माझे घर" हे खरं असलं तरी त्यांच्याशी संवाद कसा साधणार? त्यासाठी त्यांना परदेशी भाषांची तोंडओळख, तेथील चलने,कोणती ते माहित करून दिली जाईल. नवीन भाषेच्या अभ्यासाची सुरवात आपली देवभाषा संस्कृत ने होईल. पुढे Spanish, French ई. भाषा  येतील 
       --> जमाखर्च-- accountancy-- बजेट--विदेश व्यापार--बँकिंग--शेयर मार्केट  इत्यादी सर्व विषय  क्रमाक्रमाने मासिकात येतील. 
       --> मुलांची वैज्ञानिक वृत्ती जागृत करण्यासाठी त्याला खगोल, रसायन आणि भौतिक शास्त्र आकर्षकपणे सांगितले जाईल. 
      --> त्यांच्यापुढे थोर व आदर्श व्यक्तीमत्वांचा इतिहास ठेवला जाईल.     
२. "धर्मयज्ञ मासिक" हा संस्थेचा दुसरा उपक्रम. यामध्ये अद्वैत तत्वज्ञान, उपनिषदावर चर्चा/चिंतन, आधुनिक युगातील प्रत्येकासाठी उपयुक्त भागवतातील भागवत धर्म, गीताज्ञान, ब्राम्हसुत्रावर विवेचन असे अनेक विषय आहेत.

३. श्रीमद्भागवत अभ्यासक्रम: तत्वजिज्ञासेच्या मार्ग्क्रमणास सुरुवात करण्यासाठी हा अत्यंत सोपा, उपयुक्त, आणि आनंद देणारा १ वर्षाचा श्रीमद्भागवत परिचय हा प्राथमिक अभ्यासक्रम. त्यानंतर त्या तत्वाशी एकरूप होण्याची तळमळ निर्माण करणारा ४ वर्षाचा भागवत सखोल अभ्यासक्रम. या दोन्ही अभ्यासक्रमांची संपूर्ण जवाबदारी अनुक्रमे डॉक्टर श्रीकांत कुलकणी, मिरज (०९३७२२२३४८७) व श्री. विद्याधर परांजपे, पुणे (०९८५००७०४१४) सांभाळतात. हे दोन्ही उपक्रम २० केंद्राप्रमुखाद्वारे राबवले जतत.      
४. भागवत अभ्यास वर्ग: धन्वंतरी सभागृह, कर्वेनगर, पुणे येथे दर महिन्याला (साधारण ३-४ दिवस) हा अभ्यासवर्ग गेटला जातो. ठिकठिकाणी असे अभ्यासवर्ग आयोजित केले जाऊ शकतात. एका दिवशी साधारण ३ तासांचा अभ्यासवर्ग.
श्रीमभ्दागवत परिचय अभ्यासक्रम.

Study Questions



५. नामसहस्त्र पठण: चित्तशुद्धी शिवाय आणि मनाच्या प्रसन्नतेशिवाय कोणतेही ध्येय गाठणे कठीण. मनाची एकाग्रताही अशक्य. चित्तशुद्धीचा सोपा मार्ग म्हणजे "अर्थ जाणून घेऊन नामसहस्त्राचे पठण. 

No comments:

Post a Comment