Tuesday 25 June 2019

गीता फौंडेशन
चैतन्य, लोकमान्य सोसायटी, मिरज
ई-मेल : geetafoundation@gmail.com
Website : www.shrivishnusahasranaam.com
Mobile : 9860032082 / 9021938204

३ जून, २०१९

गीता फौंडेशन, मिरज तर्फे श्रीविष्णूसहस्रनामाच्या १२ कोटी सामूहिक आवर्तनांचा संकल्प केला आहे. हा उपक्रम १ जानेवारी २०१९ पासून सुरु झालेला आहे. याबद्दलची माहिती खालील प्रमाणे.

उद्देश : दुसऱ्याचे निःश्रेयस करण्याची, चांगले करण्याची, त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची वृत्ती दृढ व्हावी हि प्रार्थना

दररोज आपापल्या घरी, दिवसातून केव्हाही विष्णुसहस्रनामाची आवर्तने करायची. महिन्यात एकूण किमान १०८ आवर्तने अथवा दिवसाला किमान दोन आवर्तने करायची. यापेक्षा जास्त झाल्यास उत्तम. महिन्याभराची (म्हणजे दैनंदिन) आवर्तनांची नोंद ठेवायची व महिन्याच्या एकूण आवर्तनांची संख्या पुढील महिन्याच्या १५ दिवसांपर्यंत केव्हाही संस्थेला कळवायची.

उपक्रमात भाग घेण्यासाठी संस्थेला खालील माहिती कळवा.

आपले संपूर्ण नाव,  आपले वय, आपल्या गावाचे नावं आणि आपला मोबाईल नंबर. एक मोबाईल नंबर एकदाच एका नाव नोंदणीसाठीच वापरायचा. नाव नोंदवल्यानंतर प्रत्येकाला एक नोंदणी क्रमांक दिला जातो. तो नोंदणी क्रमांक, आपले नाव,  महिना आणि आवर्तनांची संख्या संस्थेला कळवायची. या महिन्याची आवर्तनांची संख्या पुढील महिन्यात, पुढील महिन्याची आवर्तनांची संख्या त्यापुढील महिन्यात याप्रमाणे कळवत राहायचे.

श्रीविष्णूसहस्रनामाचे स्तोत्र म्हणावे हि अपेक्षा. पण कोणी नामावली म्हटली तरी चालेल.

नाव नोंदणी व आवर्तन नोंदणीसाठी खालील नंबरवर फोन करा.
  • 9860032082 - नितीन (Whatsapp नंबर)
  • 9021938204 - राधा
नाव नोंदणी / आवर्तन नोंदणीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळावर जाऊन स्वतः देखील नोंद करू शकता.

       सध्या सुमारे १२,००० जणांनी नावे नोंदवली आहेत. पण एवढ्या बळावर संकल्प पूर्ण होण्यास खूप वर्षे लागतील. संकल्पपूर्ती लवकर होण्यासाठी सभासद संख्या ४०,००० पेक्षा जास्त झाली पाहिजे. त्यासाठी आपण उपक्रमाचा खूप प्रसार करा. आपण whatsapp ग्रुप करून त्यावर लोकांना invite करा. संस्थेला फोन करून नाव नोंदणी करा असे आवाहन करा. उपक्रम जगभर पोहोचला पाहिजे. एकट्या महाराष्ट्रातून ४०,००० सभासद होणे अवघड नाही. सर्वांच्या सहकार्यानेच हा नामयज्ञ सफल होऊ शकतो.

काहीही अधिक माहितीसाठी वरील नंबरवर मला संपर्क करा. माझे नाव आपटेकाका.

धन्यवाद
श्रीकृष्णः शरणं मम |

आपला सुहृद,
आपटेकाका